तालुका
अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचा उदघाटन व लोकार्पण सोहळा
नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका येथील अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचा उदघाटन व लोकार्पण सोहळा दि २९ ऑगस्त रोजी माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास जमलेल्या माणगावकर नागरिकांना संबोधित करताना शिंदे साहेब म्हणाले की माणगाव नगरपंचायत क्षेत्रातील प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केले.
याप्रसंगी माणगाव शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. राजीव साबळे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रकाश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.



