जिल्हा

“इन्स्पायर ॲवार्ड मानक” योजना

 

डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक

“इन्स्पायर ॲवार्ड मानक” ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडील एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही योजना नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन (NIF), गांधीनगर, गुजरात यांच्या मार्फत राबविली जाते. ही योजना केंद्र पुरस्कृत आहे.

“इन्स्पायर ॲवार्ड मानक” या योजनेचा मूळ हेतू इ. 6 वी ते इ.10 वी मधील वय वर्षे 10 ते 15 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्मितीक्षम / नाविन्यपूर्ण विचार विकसित करणे हा आहे. त्यांच्यापैकी उत्कृष्ट कल्पनांचा उपयोग करून देशासाठी व समाजासाठी त्याचाउपयोग करणे व त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून तयार केलेल्या prototype मधून product development करिताउद्युक्त करणे, असा महत्वाकांक्षी उद्देश आहे.

“इन्स्पायर ॲवार्ड मानक” (Milion Minds Augmenting National Aspiration and Knowledge) योजनेंतर्गत इयत्ता 6 वी ते10 वी या वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

यामध्ये शासन मान्यताप्राप्त सर्व माध्यमांच्या शाळा सहभाग घेवू शकतात. सर्व शाळा म्हणजे शासकीय, जिल्हा परिषद,  महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदेच्या शाळा, खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित शासनमान्य शाळा/ मिशनरी शाळा/ आश्रमशाळा होय.

(NIF), गांधीनगर गुजरात व संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडील पत्रप्राप्त होताच सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी “इन्स्पायर ॲवार्ड मानक” या योजनेसाठी शाळांचे रजिस्ट्रेशन व विद्यार्थ्यांची ऑनलाईननामांकने http://www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर सादर करायची असतात. या वेबसाईटवर योजनेबाबतसविस्तर माहिती उपलब्ध आहे.

Ø  प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त 05 विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात.

Ø  ऑनलाईन नॉमिनेशन सादर केलेल्या विद्यार्थ्यांची निवड NIF अहमदाबाद यांच्या कडून करण्यात येते.  निवड झालेल्या प्रत्येकविद्यार्थ्यास रक्कम रु.10 हजार प्रोत्साहनपर देण्यात येतात.

Ø  “इन्स्पायर ॲवार्ड मानक” प्रदर्शन जिल्हास्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर आयोजित करण्यात येते.

Ø  ज्या विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तराकरिता होते, त्यांना राष्ट्रीय स्तरावरुन वैज्ञानिक तसेच संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शनकरण्यात येते.

Ø  राष्ट्रीयस्तर प्रदर्शनामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी मिळते.

विद्यार्थ्यांनी / मार्गदर्शक शिक्षक यांनी ऑनलाईन प्रकल्प नोंदणी करताना प्रकल्पाबाबत पुढीलप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे. :-

ü  विज्ञान प्रकल्प नाविन्यपूर्ण असावे, वारंवार सादर करण्यात आलेले प्रकल्प सादर करण्यात येऊ नये.

ü  जे प्रकल्प सादर करणार आहात, ते सद्य:स्थितीत देशास/समाजास भेडसावत असणाऱ्या विविध समस्या/प्रश्न सोडविण्यास मदतकरणारे असावेत.

ü  तंत्रज्ञान विषयक प्रकल्प सादर करताना त्यामध्ये नाविन्यपूर्ण विषय असावा. यात विविध मशिन्स, गॅझेट्स, माहिती तंत्रज्ञानावरउपकरणे इत्यादिचा समावेश करता येईल.

ü  हे प्रकल्प समाजातील विविध घटकांकरीता उपयोगी असावेत.

ü  हे प्रकल्प प्रत्यक्षात राबविता येतील, असे असावेत,

ü   सादर करण्यात आलेले प्रकल्प शासनस्तरावर प्रत्यक्षात राबवावयाचे असल्यास/अंमलात आणल्यास त्याचा खर्च कमीत कमी कसायेईल, यावर भर द्यावा.

या योजनेबाबतची माहिती http://www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

“इन्स्पायर ॲवार्ड मानक” योजनेबाबतची माहिती  सर्व शाळांपर्यंत पोहचविण्याकरीता ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन :-

करोना विषाणूच्या फैलावामुळे मागील दोन वर्षापासून शाळा बंद असून ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु आहे. त्यामुळे शिक्षण विभाग(माध्यमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्यामार्फत सन 2019-20 व 2020-21 या दोन्ही वर्षांमध्ये “इन्स्पायर ॲवार्ड मानक” (Inspire Award MANAK) या योजनेबाबत माहिती जिल्हयातील सर्व शाळांपर्यंत पोहचविण्याकरीता ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरआयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये तज्ञांमार्फत योजनेबाबतची तसेच ऑनलाईन नॉमिनेशन कशी सादर करावीत, प्रोजेक्टस्कसे असावेत, ते कसे सादर करावेत, याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली.

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये 8 वे “इन्स्पायर ॲवार्ड” (INSPIRE AWARD) राज्यस्तरीय प्रदर्शन, दि. 08 ते 10 फेब्रुवारी2020 या कालावधीत सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत राष्ट्रीयस्तराकरीता जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील महात्मा गांधी विद्या मंदिर, चोरढे या शाळेतील विद्यार्थिनी कु.अपूर्वा अशोक सुभेदार हिचीराष्ट्रीय स्तराकरीता निवड झाली होती.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये रायगड जिल्हयातील एकूण 606 शाळांपैकी 182 शाळांनी सहभाग घेऊन 469 विद्यार्थ्यांचेनॉमिनेशन सादर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!