जिल्हा

रायगड जिल्हा माहिती भवन उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश

प्रतीक पलंगे – जिल्हा प्रतिनिधी रायगड

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘मुख्यालयाचे बळकटीकरण व विभागीय/ जिल्हा माहिती कार्यालय/ माहिती भवन इमारतबांधकाम‘ योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यानुषंगाने रायगड येथे सुसज्ज असे जिल्हा माहिती भवनलवकरच साकारण्यात येणार आहे.

जिल्ह्यात विकास संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. या अद्ययावत जिल्हा माहिती भवनामध्ये जिल्हा माहिती कार्यालय, मिनी थिएटर, मिनी स्टुडीओ, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, प्रदर्शनदालन,  विविधोपयोगी सभागृह, डिजीटल वाचनालय, मिडीया संनियंत्रण कक्ष, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरीता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र असणार आहे.

 रायगड जिल्हा हा औद्योगिक व पर्यटनाच्यादृष्टीने पसंतीचा आहे. जिल्ह्यातील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोंकण रेल्वे, सागरीवाहतूक या माध्यमातून येणारे पर्यटक व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जनता शेती व पारंपरिक मासेमारी व्यावसायिक असून ग्रामीण, डोंगराळ व दुर्गम भागात वास्तव्यास आहे. शासनाच्या योजनांची तसेच शासनाच्या विविधकामांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत तत्परतेने पोहोचविणे, ही एक अत्यावश्यक बाब आहे. आधुनिक काळाच्या आवश्यकतेनुसार जिल्हा माहिती कार्यालयात माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत व सुसज्ज मनुष्यबळ असणार आहे. माहिती वजनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या दूरदृष्टीने कार्यरत होणाऱ्या रायगड जिल्हा माहिती भवनामुळे विविध जनसंपर्क सेवा उपलब्ध होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!