महाराष्ट्र

कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण

मोझॅक-3 तंत्रज्ञान असणारे VERSA HD रेडिएशन थेरपी मशीनचे लोकार्पण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते

स्वप्नील ढवण – उपसंपादक

कर्करुग्णांवर उपचार करणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण होत आहे. अचूक उपचारासाठी मोझॅक-3 तंत्रज्ञान असणारे VERSA HD रेडिएशन थेरपी मशीन बसविण्यात आली. त्यांचे लोकार्पण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी त्यांनी सांगितले सर्वसामान्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना गंभीर आजारातून दिलासा देण्याचे काम या हॉस्पिटल ने केले आहे. अचूक निदान करणारे रेडिएशन थेरपी मशीन बसविल्या बद्दल डॉ. सुरज पोवार यांचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार प्रकाश आण्णा आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, व्ही. बी. पाटील, माजी नगरसेवक आदिल फारस, डॉ. रवींद्र हत्तरकी, डॉ. स्वप्निल हुपरीकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!