तालुका

निगुडशेत ग्रामपंचायत सोलमवाडी गावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये जाहीर प्रवेश

डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक

तळा तालुक्यात निगुडशेत ग्रामपंचायत मधील सोलमवाडी गावाने केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश, कर्तव्यदक्ष राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बबन चाचले, चंद्रकांत राऊत, रविंद्र मांडवकर, सुरेश कदम, संदीप मोंडे, देविदास रामाणे, रणजित मोडके यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी सोलमवाडी गावातील भाजप च्या तळा तालुका महिला अध्यक्षा राजेश्री सोलम, शेकाप चे कार्यकर्ते राजेश सोलम, केशव सोलम, शिवसेनेचे सर्व सोलमवाडी गावातील कार्यकर्ते तुकाराम पाटेकर, देविदास बांद्रे यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थ व मुंबईकर यांनी पक्ष प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश खासदार श्री. सुनिलजी तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद सभापती गीता जाधव, पंचायत समिती सभापती अक्षरा सचिन कदम, जिल्हा परिषद  सदस्य बबन चाचले व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळा तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!