तालुका

श्रीवर्धन मध्ये स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा

हरिहरेश्वर व महाड येथील बचाव कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

 

जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन

श्रीवर्धन: भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवी दिवस श्रीवर्धन मधील जनतेने जल्लोषात साजरा केला आहे. श्रीवर्धन न्यायाधीश सोनाली जवळगेकर यांच्या हस्ते सकाळी 07:50 वाजता न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. सकाळी आठ वाजता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या हस्ते  नगरपरिषद प्रांगणात 08:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहण करण्यात आले, श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात विविध शालेय स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

 श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे समुद्रात बुडणाऱ्या  महिला पर्यटकांना वाचवणाऱ्या शोहेब हमदुल्ले व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सदरच्या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे म्हणाले आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करतोय ही बाब आपल्या सर्वांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे, भारत देशाने  सर्वच क्षेत्रांमध्ये अलौकिक स्वरूपाचे यश प्राप्त केले आहे, भारत देशाची राज्यघटना देशातील प्रत्येक घटकास समान हक्क अधिकार बहाल करते, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कला क्रीडा विज्ञान त्यासोबत  सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये देशाची वाटचाल अभिमानास्पद आहे, भारताचे नागरिक जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत, विद्यार्थ्यांसाठी अनेक आदर्श तरुणपिढीने निर्माण करून दिलेले आहेत.

यावर्षी संपन्न झालेल्या विविध जागतिक स्पर्धांमध्ये  ग्रामीण भागातील तरुणांनी  नवा आदर्श प्रस्थापित केला आहे, अमित शेडगे पुढे म्हणाले आजच्या या पवित्र दिवशी आपण समाजकार्यात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या व्यक्तींचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान केला, महाड शहरात आलेल्या पूरप्रसंगी श्रीवर्धन मधील  शोएब हमदुल्ले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद काम केलेले आहे, आपण सर्वांनी विविध नैसर्गिक संकटाचा अतिशय नेटाने, समर्थपणे  सामना केला त्याबद्दल आपणा सर्वांचे  आभार. श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश प्राप्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वोत्पारी सहकार्य करण्यासाठी सदैव सज्ज आहे असे अमित शेडगे यांनी सांगितले. सदरच्या कार्यक्रमासाठी तहसीलदार सचिन गोसावी, पोलीस निरीक्षक संजय पाटील, वनरक्षक मिलिंद राऊत, मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर, र ना राऊत  महाविद्यालय, गोखले एज्युकेशनचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!