तळा तालुक्यामध्ये नवीन पत्रकार संघाची स्थापना
तळा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा भोसले यांची करण्यात आली निवड
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
तळा तालुक्यामध्ये नवीन पत्रकार संघाची नव्याने स्थापना करण्यात आली, तळा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार कृष्णा भोसले यांची निवड करण्यात आली, कार्याध्यक्षपदी पत्रकार संध्या पिंगळे, सचिव पदी पत्रकार श्रीकांत नांदगावकर, सदस्य पत्रकार संतोष जाधव व AS मराठी न्युज चे पत्रकार सुरज पुरारकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सोनसडे येथील कालभैरव सभागृहात हा कार्यक्रम पार पडला, यावेळी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा भोसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की तळा तालुका पत्रकार संघ हा सामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढणार असून तालुक्यातील रस्ते, पाणीसमस्या, विज समस्या अशा अनेक समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यास कटिबद्ध आहे. यावेळी त्यांनी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आल्यामुळे सर्वांचे आभार मानले तसेच पत्रकारांना भेडसावणारे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.



