एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
एसटी च्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा सरकारने निर्णय घेतला, आज १२००० रूपयांवर काम करत असलेल्या व १ ते १०वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये पगारवाढ करण्यात आली, ११ ते २० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये पगारवाढ करण्यात आली, ज्या कर्मचाऱ्यांना १७ हजार पगार भेटतोय त्यांचापगार २४ हजार रुपये होणार, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता मिळणार, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला १०तारखेच्या आत होणार, सर्व निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि सेवा समाप्ती रद्द केली जाणार, महामंडळाचं उत्पन्न वाढलं तर ड्रायव्हर आणि वाहकांना इन्सेंटिव्ह मिळणार, उद्या सकाळी ८ वाजल्यापासून कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे आवाहन.



