तालुका

कुडपण येथील पदाधिकारी यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

कुडपण येथे जल जीवन योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते 

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून नावारूपाला आलेल्या कुडपण येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

त्यावेळी मधले कुडपण येथील काँग्रेस पक्षातील संपूर्ण महिला भगिनीं – ग्रामस्थ आणि मुंबईकर यांनी केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश. अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून विकास कामे न झाल्यामुळे आणि या भागातील सर्व विकासकामे ही आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शिवसेनेच्या माध्यमातूनच होत असल्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असे कुडपण करांनी यावेळी सांगितले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, विभाग प्रमुख सतीश शिंदे, लक्ष्मण मोरे, प्रभाकर पवार, विजय बुवा, शिवसेना युवा सेनेचे या भागातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी आमदार गोगावले यांनी प्रवेश कर्त्यांना शिवसेना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल तसेच आपण या शिवसेना पक्षात नव्हता तरीपण आपली विकास कामे आम्ही करतच होतो तसेच आपली जी काही उर्वरित विकास कामे राहिली आहेत ती लवकरच पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे प्रवेश कर्त्याना आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!