तालुका

शिवसेना महिला आघाडी महाड शहर तर्फे जागतिक महिला दिन साजरा

महिला दिनाच्या निमित्त महाड शहरांमधील कष्ट करून समाजाचा व आपल्या संसाराचा गाढा ओढत असणाऱ्या सत्कार

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड

महाड : शिवसेना महिला आघाडी महाड शहर तर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाड शहरांमधील समाजातील आयुष्यभर कष्ट करून आपल्या समाजाचा आणि आपल्या संसाराचा गाढा ओढत असणाऱ्या काही महिलांचा शिवसेना महिला आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला.

भगवानदास बेकरी येथील फळांचा व्यवसाय करणाऱ्या महिला, कोटेश्वर तळे येथील बाळ बाळंतिणींचे मसाज करणाऱ्या सुईण पवार आजी जाधव मालुसरे खानावळ चालवणाऱ्या मालुसरे ताई, कोर्ट आळी येथील आरोग्य सेविका बेगम युसुफ चिलवन, बाजारपेठेत चपलांचा व्यवसाय करणाऱ्या ताई, भजीचा व्यवसाय करणाऱ्या चांदूरकर ताई, सरकारी दवाखान्यातील नर्स आणि महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करून महिला आघाडीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!