तालुका

अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम (महाराष्ट्र) वतीने तालुका स्तरीय महिला मेळावा

जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन

अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने माणगाव तालुका सेवा समिती वतीने शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी श्री गोरक्षनाथ मंदिर, माणगाव येथे महिला मेळावा संपन्न झाला.

या मेळाव्याला 145 महिला भगिनी व 65 गुरुबंधू उपस्थित होते. कार्यक्रमची शुभारंभ जगद्गुरु श्री माऊलींच्या नामगजराने करण्यात आली, विंचवली ते श्री गोरक्षनाथ मंदिर पर्यंत पालखी व दिंडीने करण्यात आली, दिंडीध्ये कलशधारी महिला, झेंडेधारी महिलानी पारंपरिक वेशभूषा मध्ये सहभागी झाले होते. कार्यकम ठिकाणी श्री मारुलीचे पालखीचे आगमन नंतर पाद्यपूजा करण्यात आली, त्यानंतर धूपारती झाली, उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी नाणिजधाम / वसई पिठावर सेवेसाठी गेलेल्या महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. यानंतर एक तास “गणी गण गणात बोते” या महामंत्राचा नामजप करण्यात आला.

दुपारच्या सत्रात ज.न.म. प्रवचकार सुकन्या पालेकर ताई पुणे यांनी प्रबोधन करुन मार्गदर्शन केले, श्री. गणेशजी मोरे परभणी पिठ प्रमुखयांनी ही मार्गदर्शन केले. यानंतर सायंकाळी 5.00 वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर महिला मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा निरीक्षक सुनल वीर, जिल्हा सेवाध्यक्ष सुधीर पुळेकर, जिल्हा महिला प्रमुख अंजली जगताप यांचे मार्गदर्शन वसहकार्य लाभले. सदर कार्यक्रम चे सुत्रसंचलन आरुणा पाटील यांनी केले. महिला मेळावा यशस्वी होण्यासाठी माणगाव तालुका सेवाध्यक्ष गुरुनाथ कामत, माणगाव तालुका महिला प्रमुख योगिता धाडवे, जि. आध्यात्मिक प्रमुख संतोष पोतदार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र दोशी, माणगाव सेवा केंद्र  प्रमुख निकीता धाडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम करीता श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, म्हसळाव मुरुड  तालुका महिला अध्यक्ष, तालुका अध्यक्ष सेवा समिती अध्यक्ष हे आपापल्या तालुकातील शिष्य साधक भक्त हितचिंतक महिलांसह उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!