जिल्हा

ग्रामपंचायत निवडणूक मतदान दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केली स्थानिक सुट्टी जाहीर

 

स्वप्नील ढवण – उपसंपादक

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग-2, मुरुड-2, पेण-3, पनवेल-3, कर्जत-3, खालापूर-2, रोहा-2, तळा-1, महाड-3, मुरुड-1, म्हसळा-1 अशा एकूण 23 ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदाच्या पोट निवडणूकीसाठी  दि. 21 डिसेंबर मंगळवार रोजी मतदान होणार असून दि. 22 डिसेंबर बुधवार रोजी मतमोजणी होणार आहे.  

या ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी वरील ग्रामपंचयात निवडणूक कार्यक्षेत्रा करिता मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!