कृषीवार्ता
शेती विषयक विविध सबसिडीकरिता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
प्रतीक पलंगे – जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी त्यांना मागणी करावयाच्या कृषी अवजारे, ठिबक व तुषार सिंचन, हरितगृह शेडनेट, पंपसेट, पाईपलाइन यांच्या सबसिडी करिता अर्ज करावेत. त्याचप्रमाणे कीटक नाशक, बुरशी नाशक औषधांसाठी ज्या कृषी सेवा केंद्रांवर महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास केंद्र (MAIDC) यांची औषधी विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणावरून खरेदी केल्यास 50% अनुदान देण्यात येत आहे.
त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. उज्वला बाणखेले यांनी केले आहे.



