आरोग्य व शिक्षण

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते पनवेल उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस व रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन संपन्न

राजेंद्र मोरे – तालुका प्रतिनिधी पनवेल

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे डायलेसिस वरक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.  

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ, पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री कु. तटकरे यांनी आपण पालकमंत्री या नात्याने नागरिकांना आरोग्य विषयक सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!