महाड मधील अंबेनळी / देशमुख कांबळे गावामधील ग्रामस्थाने आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
स्वप्नील ढवण – उपसंपादक
महाड मधील अंबेनळी गावामधील ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना संघटनेवर विश्वास ठेऊन जाहीर पक्ष प्रवेश केला.
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी अंबेनळी गावामधील सर्व ग्रामस्थाने काँग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला, या वेळी वसंत बाबूराव जगताप, बाळू जाधव, दत्ताराम बाबू सकपाळ, अशोकसंभाजी जगताप, राम संभाजी जगताप, सखाराम बाबू सकपाळ, लकी किसन कदम, कळा श्रीपत जाधव, हौसाबाई किसन सकपाळ, नंदा विष्णू सकपाळ, रोहित राजू सकपाळ, शुशिला भाऊ सकपाळ, वेणूबाई गंगाराम जाधव, नारायण संभाजी जगताप यांच्यासहसंपूर्ण अंबेनळी ग्रामस्थानी आज आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.

काही दिवसांच्या अंतरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका ह्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात प्रवेश घेणार्यांची संख्या देखील वाढतआहे, देशमूख कांबळे गावातील काँग्रेस युवक पक्षामधील मनिष रविंद्र कळमकर, शुभम राजेंद्र पवार, आत्माराम कळमक, आणिता कळमकर, सुमेध साळवी, पुजा मानिष कळमकर, कुंदा रविंदर कळमकर, रामदास साळवी, विश्वास देशमूख, स्वप्नील पदमाकर देशमुख, पद्माकर गोविंद देशमूख, कल्पना रामदास साळी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी महाड – पोलादपूर – माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले, वरंध जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, वरंध विभाग प्रमुख लक्ष्मण भोसळे, वरंध विभाग युवासेना अधिकारी संजय गुरव, संदिप झांजे, विजय साळूंके, संतोष जगताप, तुकाराम जाधव, ग्रामस्थ, शिवसेना / युवासेना पदाधिकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी बोलत असताना आंबेनळी गाव हा विकास कामांपासून वंचित राहिला कारण तुम्ही सर्वजण एकत्र किंवा एकजुट नव्हता आणि तसे असता तर आत्तापर्यंत विकासापासून वंचित राहिला नसता, कारण तुम्ही ज्या पक्षात होता त्यापक्षाने तुमची निराशाच केली, तुमची कोणतीही विकास कामे आतापर्यंत झाली नाहीत, जी काही विकास कामे झाली आहेत ती शिवसेनेच्याच माध्यमातून झालेली आहेत. पण उशिरा का होईना आपणास शहाणपण सुचले आणि आपण शिवसेना पक्षात प्रवेशकेला, जी विकास कामे बाकी आहेत ती अता आमची जबाबदारी आहे, असे प्रवेश कर्त्या ग्रामस्थांना सांगितले, असून अंबेनळी गावच्या विकासाची हमी आता आम्ही घेतली आहे.



