तालुका
पारमाची, रामदास पठार आणि माझेरी या गावांमध्ये वाघाची दहशद
मिलिंद पवार – ग्रामीण प्रतिनिधी महाड
महाड तालुक्यातील पारमाची, रामदास पठार आणि माझेरी 8 जानेवारी 2022 रोजी या गावामधील शेतकरी योगेश मालुसरे हे आपल्या गुरांना चाऱ्यांसाठी जंगलामध्ये घेऊन गेले असता त्यांच्या कळपावरती वाघाने अचानक हल्ला केला, पण त्यामधील इका वासरावर वाघाने हल्ला केला, बाकीचे वासरे सुखरूप आहेत, जखमी झालेल्या वासरावर उपचार सुरु आहेत आणि सुखरूप आहे.
पारमाची, रामदास पठार आणि माझेरी या गावामधील परिसरात खूप झाडे झुडपे आहेत, यामुळे तेथील रहिवाशांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे प्रकार वारंवार होऊ नयेसाठी वनविभागाने याची दखल घेण्याची मागणी गावकरी करत आहेत.



