तळा तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते
सुरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा
तळा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये मौजे गणेश नगर येथील संरक्षण भिंतीचे भूमीपूजन व रस्त्याचे भूमीपूजन त्याचप्रमाणे मौजे पन्हेळी येथील अंगणवाडीचे उद्घाटन, अंतर्गत रस्त्याचे उद्धाटन आणि पन्हेळी येथील सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

या भागात शासकीय योजनांद्वारे निधी प्राप्त करून अनेक विकास कामे करण्यात आली आहे. या पुढेही येथील विकासकामांसाठी प्रयत्नशील आहे. यावेळी जि.प. सभापती गिताताई जाधव, जि. प. सदस्य बबन चाचले, पं.स. सभापती अक्षरा कदम, तालुकाध्यक्ष नानाभौड, तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, युवक तालुकाध्यक्ष नागेश लोखंडे, भास्कर कारे, सरपंच रजिता मोडके, नामदेव बटावळे, महिला मंडळ, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.




