ब्रेकिंग
गायक – संगीतकार बप्पी लाहिरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप
अभिजीत ढाणिपकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
गायक – संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन झालंय. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.
आलोकेश लाहिरी असं त्यांचं नाव असून त्यांना सगळे बप्पी लहरी या नावानं ओळखत होते. बप्पीदा नावानं प्रसिद्ध असलेल्या लाहिरीयांना ते परिधान करत असलेल्या प्रचंड सोन्यामुळंही वेगळी ओळख मिळाली होती, गेला महिनाभर ते आजारी असल्याने रुग्णालयात होते. 15 फेब्रुवारीलाच त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं, पण त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. गेल्यावर्षी त्यांना कोव्हिड झाला होता. ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियाने‘ त्यांचं काल रात्री निधन झाल्याची माहिती डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली आहे.



