ब्रेकिंग

शिवज्योत आणण्यासाठी रायगडला निघालेल्या शिवभक्तांचा अपघात

सागर पवार - मुख्य व्यवस्थापकीय संपादक

200 फुट खोल दरीमध्ये कोसळली बाईक

महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे वाचवले प्राण

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती यानिमित्त महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंती निमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञता पूर्वक वंदन केलं जाते.

आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांची मोटरसायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळल्याचे समजते, या अपघातामध्ये तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमींची नाव केतन देसाई (वय 23), प्रथमेश गरुड (वय 25) आणि किरण सुर्यवंशी (वय 20) भोंगवली तालुका येथे सर्व राहणारे आहेत.  त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाला प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!