तालुका
महाड वकिल बार असोसिएशनची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी ॲड. संजय भिसे
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड दि. 24 महाड वकिल बार असोसिएशनची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी ॲड. संजय भिसे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
वकिल बार असोसिएशनच्या या निवडणुकीत प्रत्येक पदासाठी केवळ एक एक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड विजय मेहता यांनी जाहीर केले. अध्यक्षपदी ॲड. संजय भिसे, उपाध्यक्ष पदी ॲड. संतोष काळे, सचिवपदी ॲड. कैलास पवार, सहसचिव पदी ॲड. दर्शन कदम, खजिनदार ॲड. भाऊ साळुंखे.
तर कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. अ. कादिर देशमुख, ॲड. माधवी धारिया, ॲड. सलील मेहता, ॲड. सनी जाधव, ॲड. संदीप सर्कले, ॲड. मनोज पवार, ॲड. संदीप कालगुडे, ॲड. रोहन मेहता, ॲड. गायत्री पयेलकर, ॲड. विद्या पवार हे सर्व बिनविरोध निवडून आले आहेत.



