महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्याचे पालकमंत्री, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?


मितेश
महाले – सहसंपादक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याहीचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं नाही. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर आणि  कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील – पुणे                        विजयकुमार गावित– नंदुरबार
गिरीश महाजन– धुळे, लातूर, नांदेड                  गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे– नाशिक                                            संजय राठोड– यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे– सांगली                                       संदिपान भुमरे –औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड                         तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण– पालघर, सिंधुदुर्ग                        अब्दुल सत्तार– हिंगोली
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर                अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे                     मंगलप्रभात लोढा –मुंबई उपनगर 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!