ददली मध्ये महाशिवरात्री उत्सव संपन्न | उत्सवानिम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन
संदेश चौधरी - संपादक कोकण विभाग
01 मार्च रोजी महाड तालुक्यातील दादली येथे श्री. काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव संपन्न झाला, यावेळी विविधकार्क्रमाचे आयोजन करण्यात आले, मुखवटा स्थापना व धार्मिक विधी संतोष देवचंद्र बुटाला यांच्या हस्ते करण्यात आले.
व इतर विविध कार्यक्रम सुमित तुपट सरपंच दादली, आशिष जाधव उपसरपंच, संतोष लाले त. मु. अध्यक्ष, संतोष पेंढारी गाव कमिटीअध्यक्ष, मंगेश गिरी दशनाम गोसावी समाज अध्यक्ष, दिनेश जाधव, तुषार पाटील उपसरपंच कोल यांच्या हस्ते संपन्न झाले.

भगवान शंकराचा महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री, दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते. शिवाजी महानरात्र म्हणून महाशिवरात्र असं म्हटलं जातं. संपूर्ण भारतभर महाशिवरात्रीचा उत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो.
महाशिवरात्र प्रत्येक शिवभक्तासाठी अत्यंत खास असते. या दिवशी अनेक भाविक उपवास धरतात. तर अनेकजण शिवमाहात्म वाचन, मंत्रौच्चारण, जप यात दिवस व्यथित करतात. शंकराच्या पिंडीवर पाणी–दूध यांचा अभिषेक केला जातो. शंकराला प्रिय असलेले पांढरंफुल, बेल वाहून पूजा केली जाते.



