ब्रेकिंग

महाडच्या छबिनानिमित्त दुदैवी घटना | पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

सागर पवार - मुख्य व्यवस्थापकीय संपादक

महाड: आकाश पाळण्यात डोक्याचे केस अडकल्याने एक महिला गंभीर जखमी होण्याची घटना महाडच्या छबिन्यात घडली. या महिलेला अधिक उपचारांसाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.

पल्लवी सुरेश कोळवणकर ( वय ३०, रा. निजामपूर, ता. माणगांव ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ती आपल्या कुटुंबासह छबिन्याचा आनंद घेण्यासाठी महाडमध्ये आली होती. पाळण्यात बसत असताना अचानक पाळणा सुरु झाला आणि तिच्या डोक्याचे केस पाळण्यात अडकले. त्यामुळे डोक्याच्या केसांसह डोक्याच्या त्वचेचा मोठा भाग उपटून पडला, तिला तातडीने महाड मधील डॉ. रानडेयांच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. रानडे यांनी त्वचेचा हा तुटलेला भाग शिवून या महिलेला अधिक उपचारांसाठी मुंबईला पाठविले आहे. या बाबतीत अधिक तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!