महिलांसाठी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व ग्रामीण प्रगती फाउंडेशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 02.00 वाजेपर्यंत गांधी मेमोरियल हॉल”, निजामपूर रोड, मुंबई-गोवा हायवे जवळ, ता.माणगाव या ठिकाणी जिल्ह्यातील बेरोजगार महिलांसाठी विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.
त्यासा़ठी या विभागाचे संकेतस्थळावर https://rojgar.mahaswayam.gov.in नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी. ही माहिती भरताना प्रथम संकेतस्थळावर Employment – Employer (List a Job)- Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्ह्याच्या नावावरील View Details – Job Details – Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील Save Vacancy वर क्लीक करावे. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment-Employer (List a Job)-Register या क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व आपल्या आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर उपरोक्तप्रमाणे आपलेकडील रिक्तपदे अधिसूचित करुन संकेतस्थळावर दि. 18 ऑगस्टपर्यंत नोटीफाइड करावीत.
संकेतस्थळावर नवीन नोंदणी करणे व रिक्तपदे अधिसूचित करणे या संदर्भात आपणास काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री.महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांच्या मो.9421613757 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.



