स्वदेस फाउंडेशन चे संस्थापक रॉनी स्कूरवाला व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांची महाड मधील चार आदर्श गावांना दिली भेट
संदेश चौधरी - संपादक कोकण विभाग
स्वदेस फाउंडेशन या माध्यमातून महाड तालुक्यात ग्रामीण सक्षमीकरण्याचे काम सुरू आहे, त्याच माध्यमातून स्वदेस फाउंडेशन चेसंस्थापक रॉनी स्कूरवाला व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे तसेच स्वदेस फाउंडेशन चे सर्व डायरेक्ट यांनी महाड तालुक्यातील २५ आर्दश गावांपैकी ४ गावाना भेट दिली.
यामध्ये गोंडाळे झांजेकोड, वरंध, आंबेशिथर, रेवतळे आंग्रेकोंड या चार आर्दश गावांना भेट दिली, तर एका ठिकाणी विभागीय सभेला उपस्थिती दर्शविली, या चार गावांपैकी प्रथम गोंडाळे झांजेकोंड या आर्दश गावाच्या स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या गावाला भेट दिली.

या ठिकाणी काजु युनिट कंपनी चे उद्घाटन केले, त्यानंतर फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने लेझीम ताश्याच्या गजरात युवकांनी त्यांचे स्वागत केले, गाव विकास समितीने बांधलेल्या रुमचे उद्घाटन केले व संपुर्ण या गावामध्ये आर्दश गावाच्या योजने मध्ये व त्यापेक्षा आधीनाविन्यपूर्ण उपक्रम केलेल्या कामाची स्वदेस फाउंडेशन चे संस्थापक रॉनी स्कूरवाला व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी पाहणी केली.
त्यानंतर वरंध मध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन केले, हे उद्घाटन आशुराज देशमुख यांच्या शेतात ठिबक सिंचनप्रकल्प केलेल्या ठिकाणी रॉनी स्कूरवाला व मंगेश वांगे यांच्या हस्ते करण्यात आले, हे उद्घाटन जवळपास ६५ एकर क्षेत्र पाण्याखाली आलेल्या योजनेचे आहे, हे एका नकाक्षाद्वारे दाखविण्यात आले, या ठिकाणी युवक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन फळबाग लागवडी संदर्भात वरंध गावचे व्हिझन आणी मिशन कसे आहे, असे रॉनी स्कूरवाला यांना सांगण्यात आले, त्यानंतर टाळम्रृधुंगाच्या गजरात नाचुनगाऊन वारकरी दिंडी तयार करून त्या दिंडीच्या गजरात गाव विकास समितीनी रॉनी स्कूरवाला व मंगेश वांगे यांचे ज़ंगी स्वागत करण्यात आले, यावेळी १२ गावच्या विकास समितीनी उपस्थिती दर्शविली.
तसेच ज्या गावा विकास समिती नी आर्दश गाव योजनेच्या स्पर्धे मध्ये भाग घेतला आहे, आशा समितीने आपल्या गावाच्याविकासासाठी आपण कश्या पद्धतीने काम करत आहोत हे स्टॉल लावुन उपस्थितांना सादरीकरण करून समजावुन सांगितले. तसेच स्वयंसाहाय्यता महिला बचत गटांनी आपापल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते, त्या स्टॉल देखील रॉनी स्कूरवाला यांनी भेट दिली, आंबेशिवथर या ग्रामपंचायत मध्ये आर्दश गावाच्या विकासासाठी झालेली काम व त्या लोकांन मध्ये झालेला बदल दिसून आला, तसेच घरघंटी प्रकल्प दिलेल्या लाभार्थ्यांन सोबत चर्चा केली असता प्रत्येक लाभार्थ्यांनी आपापले अनुभव सांगीतला.
संपूर्ण गावाची पाहाणी करण्यात आली, त्यामध्ये उत्पन्न वाढविण्यासाठी दिलेले उपक्रम पाहाण्यात आले, तसेच पिण्याच्या पाण्याचीसोय सोलार पंपाद्वारे केली आहे, त्या प्रकल्पाचे उद्घाटन रॉनी स्कूरवाला व मंगेश वांगे यांच्या हास्ते करण्यात आले.
रेवतळे आंग्रेकोंड मध्ये देखील वारकरी दिंडी च्या माध्यमातू देखील ज़ंगी स्वागत करण्यात आले, त्याठिकाणी आर्दश गावाच्या माध्यमातून गाव विकास समिती ने व स्वयं सहाय्यता महिला बचत गटानी उभे केलेल्या कामाची पाहणी केली, महिला बचत गावांच्या माध्यमातून भाजी पाला व्यवसाय मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या प्लॉटची पाहाणी केली, तसेच आ़ग्रेकोंड येथील भेटीमध्ये ग्रामस्थांनी स्वदेस फांऊडेशन मार्फत राबवण्यात आलेल्या इत्यादी प्रकल्प व आर्थिक विकास प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली, तसेच महाड तालुक्यामध्ये स्वदेसच्या सहकार्याने उत्कृष्ठपणे काम करत असलेल्या गाव विकास समितीच्या सदस्यांबरोबर चर्चाकरण्यात आली व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यांच्या सोबत स्वप्नातील गाव याविषयी चर्चा झाली. रॉनी स्क्रूवाला व मंगेश वांगेयांनी स्वप्नातील गाव कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व गाव विकास समिती व ग्रामस्थांना शुभेच्छादिल्या, हा पाहणी दौरा यशस्वी होण्याकरिता स्वदेस चे महाड येथील व्यवस्थापक व त्यांचे सर्व सहकारी, कर्मचारी यांच्या वगावविकास समितीने मेहनत घेतली. या भेटीमुळे स्वप्नातील गाव या संकल्पनेत भाग घेण्याचे मनोबल वाढले आहे व स्वदेस फाउंडेशन, शासन व गाव विकास समिती यांच्या प्रयत्नातून अनेक गावे स्वप्नातील गावे बनत आहेत.
या कार्यक्रमासाठी स्वदेस फाउंडेशन चे संचालक अमित गुप्ता, राहुल कटारिया, रांजिश कटडिया, उपसंचालक तुषार इनामदार, प्रदीपसाठे, नीता हरमलकर, डॉ. सुरेंद्र यादव, स्वदेस फाउंडेशन चे व्यवस्थापक व समन्वयक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



