तालुका

ॐ स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न

जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन


श्रीवर्धन
– दि. ३ एप्रिल श्रीवर्धन तालुक्यातील वडघर पांगळोली येथील ॐ स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये सकाळी ठिक ८.०० वाजता प.पू.जोशी काका यांचे हस्ते ॐ स्वामी समर्थांना मंत्र घोषाने अभिषेक झाला, यावेळी मोठ्या उत्साहात असंख्य भक्त गणांसमवेत प्रकटदिन सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याकरिता पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई व पश्चिम महाराष्ट्र तसेच रायगड सह अनेक भक्त गणांनी या सोहळ्याचा लाभ घेतला, सुप्रसिद्ध अशा या ॐ स्वामी समर्थ साधना केंद्रात अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात, परंतू गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय आदेशानुसार कार्यक्रम रद्द करण्यात आले होते, मात्र चालू वर्षातील ॐ स्वामी समर्थ साधना केंद्रातील प्रकट दिन सोहळा हेनवीन वर्षातील भरगच्च असलेल्या कार्यक्रमाची हि पहिलीच वेळ आहे, या पुढील वर्ष भरात असेच कार्यक्रम भरगच्च प्रमाणात साजरे होतील असा विश्वास केंद्राचे कार्याध्यक्ष सुनिल उमरोटकर यांनी व्यक्त केला आहे.

साधना केंद्रामधून आठवड्याच्या दर रविवार आणि गुरुवार या दिवशी प.पू. जोशी काका यांचे यूट्यूबच्या  माध्यमातून अनेकअध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रम संदर्भामध्ये भक्त गणांशी संवाद साधतात, याला अनेक भक्त गणांकडून प्रतिसाद मिळतो, यामुळे अनेक भक्त गण प्रत्यक्ष जोशी काका यांची भेट घेण्यास येतात व सुसंवादाचा लाभ घेतात. ओंकार साधना, कॉसमिक हिलींगचे वर्ग, सोहमसाधना, त्राटक साधना, षटचर्क दर्शन तसेच आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती आणि प्रशिक्षण वर्ग या सारखे क्लासेस या ठिकाणी होतात याशिवाय नक्षत्र परिक्रमा, स्वामी दर्शन व परिसर पाहण्यासाठी लोकांचे हे आकर्षण केंद्र बनले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन क्षेत्रातील हे केंद्र पर्यटनामध्ये भर टाकणारे एक ठिकाण झाले आहे, अभिषेक सोहळ्याचे पौराहित्य श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील नामांकित पुरोहित जयंतराव जोशी यांनी केले, प्रकट दिनाच्या कार्यारंभी स्वामींची अभिषेक पूजाविधी तसेच जयभवानी प्रासादिक भजन मंडळ नांदगाव – मुरुड यांचे संगित भजन, तद्नंतर महाप्रसाद व स्वरगंधर्व श्रीवर्धन यांची संगित मैफिलीचा कार्यक्रम आणि श्री गुरुगोरक्षनाथ दरबार भजन मंडळ श्रीवर्धन यांचे भजना नंतर महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!