राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संवाद यात्रेचे महाड येथे आयोजन
13 एप्रिल ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भर संवाद यात्रा चालू असून दि. 13 एप्रिल 2022 रोजी दुपारी तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे संवादयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पालक मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरेयांची उपस्थिती लाभणार आहे.
महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि. ११ एप्रिल 2022 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन देखील करण्यात आले होते, यावेळी महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकास कामांना प्राधान्य देणारा पक्ष असून शेवटच्या घटकापर्यंत विकास व्हावा, शासनाच्या विविध योजना जनते पर्यंत पोहोचाव्या या दृष्टीने संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे, महाड येथे 22 व 23 जुलै 2021 मध्ये महाड येथे पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रथम खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पुरेपूर मदत महाड साठी करण्यात आली होती, त्या अनुषंगाने महाड तालुका व शहर येथील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असून योग्य वेळी प्रवेश घेतला जाईल अशा प्रकारचा सूचक इशारा देखील दिला आहे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य संतोष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सचिव रिहान देशमुख, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम, चंद्रकांत बुवा जाधव, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमहाड शहर अध्यक्ष राकेश शहा, तसेच महाड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



