तालुका

श्रीवर्धन लोड शेडींग बाबत शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी महावितरणाच्या कार्यालयात दिले निवेदन

जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन

श्रीवर्धन – दि. ११ एप्रिल २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील महावितरणच्या कार्यालयातून अवेळी होणाऱ्या लोडशेडींग बाबत श्रीवर्धन शहराला तसेच इतर आजूबाजूच्या खेडेगावांना उष्णतेच्या जळेला सामोरे जावे लागणार आहे, पवित्र अशा रमझान महिन्यामध्ये कोणतीही लोडशेडींग बाबत कोणत्याही प्रकारची पुर्वसूचना न देता महावितरणच्या मनमानी कारभारामुळे येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अरुण शिगवण, सभापती बाबुराव चोरगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर, श्रीवर्धन शहरप्रमुख राजेश चव्हाण, उपशहर प्रमुख जुनेद दुस्ते आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत त्यांनी  महावितरणच्या कार्यालयात जाऊन लोडशेडींग बाबत निवेदन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!