जिल्हा

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे अनावरण

 

अक्षय जाधव – शहर प्रतिनिधी माणगाव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याच्या बोध चिन्हाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचातत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. निसर्गाच्या या पंचातत्वा सोबत जीवन पद्धती अंगिकारल्या शिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणारनाही, म्हणूनच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्व आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्ग पूरक जीवन पद्धती अवलंबिण्यासाठी माझी वसुंधरा हे अभियान शासन राबवित आहे.

यानंतर शासनाच्या ई–पीक पाहणी या महत्वाकांक्षी अभियाना निमित्त प्रबोधन, प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत माहिती पत्रिकेचे अनावरण पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या माहिती पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई–पीक पाहणीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे त्यांचा पीक पेरा सातबाऱ्यावर नोंदविण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाविन्यपूर्ण योजनेतून साकारलेल्या रायगड वारसा इतिहासाचा संस्कृतीचा अन् निसर्ग सौंदर्याचा या लघुचित्रफितीचे उद्घाटनही पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या लघुचित्रफितीमध्ये पर्यटकांना आकर्षिक करण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील सुप्रसिध्द गडकिल्ले, स्मारके, समुद्रकिनारे यांचे चित्रीकरण प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कर्नाळा अभयारण्यातील तिबेटी खंड्या या पक्षाची रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली.

याचबरोबर आमदार महेंद्र दळवी यांनी सन 2020-21 च्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून रु.10 लाख निधी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा शाखा रायगडसाठी उपलब्ध करुन दिले आहेत व त्यात एकूण 18 संगणक उपलब्ध झाले आहेत. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक रायगडसाठी 14 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे व या निधीतून 24 संगणक जिल्हा पोलीस अधीक्षक, कार्यालयासाठी उपलब्ध झाले आहेत. या संगणकांच्या प्रतिकृतीचे यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

हे सर्व कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी,  खासदार सुनिल तटकरे,  खासदार श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुरेश लाड, मनोहर भोईर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रविंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वृषाली वाघमारे, विकास घरत, दर्शना भोईर, अमृता हरवंडकर, पद्मा पाटील, मोतीराम ठोंबरे, रीना घरत, सायली तोंडलेकर, आरती मोरे, आनंद यादव, अनूसया पादीर, सुधाकर घारे, रेखा दिसले, नम्रता कासार, राजश्री मिसाळ, मंगेश दांडेकर, बबन मनवे, किशोर जैन, चंद्रकांत कळंबे, ॲड. आस्वाद पाटील, प्रियदर्शनी पाटील, बबन चाचले, गीता जाधव, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हानियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, विविध शासकीय यंत्रणांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

चिखली, पेंढाबे, आपटा, गव्हाण, कडाव, नागोठणे, इंदापूर, खालापूर, तळा, विन्हेरे, वरंध, बिरवाडी या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी शासनाकडून दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, सर्वश्री आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मिनल दळवी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!