स्वच्छता अभियानांतर्गत रत्नागिरी येथील रापमंच्या टिमकडून महाड आगाराची पाहणी
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड: भारत स्वच्छता अभियान संपूर्ण देशात सुरु असून या अभियानांतर्गत राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांचे सर्व्हे करून त्यांचे मानांकन केले जात आहे. रायगड जिल्ह्यातील रापमंडळाच्या आगाराची स्वच्छता आणि त्यांच्या कामकाजाचे मुल्यमापन करण्यासाठी रत्नागिरी येथील अधिकार्यांची टिम महाड एसटी आगारात दाखल झाली होती.
सदर टिममध्ये रत्नागिरी जिल्हयाचे विभागीय नियंत्रक बोरसे, लेखाधिकारी चौगुले आणि उपयंत्र अभियंता श्रीमती जाधव यांचा समावेश होता. या टिमकडून आगाराची स्वच्छता, शौचालयांची अवस्था, परिसराची स्वच्छता, आगारातील बसेसचा मेंटेनन्स व स्वच्छता, रंगरंगोटी, फलाट व्यवस्था आदीची पाहणी करून आगाराचे गुणांकन करण्यात आले. यावेळी महाड एसटी आगाराचे वाहतुक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी उपस्थितांना कामकाजाची माहिती दिली.



