आरोग्य व शिक्षण

रा. जि. प. उच्च प्राथमिक शाळा वहुर महाड आभासी शाळा उदघाटन सोहळा संपन्न

उदघाटन सोहळा पं स महाडचे माजी सभापती सदानंद मांडवकर यांच्या हस्ते संपन्न

 

सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वहुर महाड शाळेचा आभासी शाळा उदघाटन सोहळा नुकताच दि 22 एप्रिल रोजी या गावचे सुपुत्र तथा पंचायत समिती महाडचे माजी सभापती सदानंद मांडवकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा वहूर ही दासगांव केंद्रातील शाळा असून ही महाड तालुक्यातील एकमेव पदोन्नती मुख्याध्यापक पदाची शाळा असून महाराष्ट्र राज्याच्या चालु शैक्षणिक वर्षातील आदर्श शाळा प्रक्रियेतील महाड तालुक्यातील एकमेवआदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे.

या शाळेतील माजी पदोनत्ती  मुख्याध्यापक मानसी प्रकाश धाटावकर यांच्या अविरत परिश्रमातून शाळा सर्व सोयींनी सुसज्ज झाली आहे, शिक्षण प्रक्रियेतील शाळेतील आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन धाटावकर मॅडमने या शाळेसाठी खुपमेहनत घेतली आहे, त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे व नीरजा नितिन कुद्रिमोती – प्रकल्प अधिकारी एन आर इस्पात अँड पावर प्राइवेट लिमिटेड छत्तीसगड यांच्या अनमोल आर्थिक साहाय्यातून आदर्श शाळा वहुर ही आभासी शाळा स्थापन झाली आहे.                                     

या शाळेतील विद्यार्थ्यांना आता संपूर्ण जगभरामध्ये माहितीचे आदान प्रदान करता येणार आहे, हीच खरी बदलत्या काळाची गरज आहे, धाटावकर मॅडम व आर्थिक सहाय्य करणाऱ्या निरजा कुद्रिमोती यांचे संपूर्ण महाड तालुक्यात कौतुक होत आहे, महत्वाचे म्हणजे अशी कौतुकास्पद कामगिरी आपल्या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या धाटावकर दाम्पत्यांना पंचायत समिती महाड व शाळेच्या वतीने सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले, खरोखरच या पति पत्नीचे संपूर्ण महाड तालुक्यामध्ये कौतुक केले जात आहे.

या वेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक विभाग, नीरजा कुद्रीमोती मॅडम, पनवेल डायटचे अधिव्याख्यते, उत्तम तरे सर– प्राचार्यबी.एड.कॉलेज नेरळ, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारीवर्ग या सर्वांनी सदर लाईव्ह कार्यक्रमास जॉईन होऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत व कौतुक केले आहे. तसेच सदर कार्यक्रमास सुनिता चांदोरकर – गट शिक्षणाधिकारी पं.स. महाड, सखाराम जाधव – केंद्र प्रमुख दासगाव, प्रकाश धाटावकर – पदवीधर शिक्षक, राहुल साळवी– सचिव आदर्श शाळा समिती, सूर्यकांत शिगवण – शिक्षण प्रेमी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, वूपालक वर्ग, महिलावर्ग, तसेच सुरेश जाधव, मिस्त्री, दिनेश मिंडे– प्राथमिक शिक्षक व शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!