शहर
दहीवली कोंड येथे कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न
प्रतीक सपकाळ – शहर प्रतिनिधी गोरेगाव
माणगाव : माणगाव तालुका मधील गोरेगाव येथील दहीवली कोंड येथे ग्रामपंचायत हद्दीतील मराठे आळी रस्त्याचे उद्घाटन तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना आणि दहीवली कोंड मोहल्ला अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन समारंभ दि. २६ एप्रिल रोजी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते व विभागातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि महिला यांच्या उपस्थितीत विकास कामांचा उद्घाटन सोहळा व भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
या वेळी स्थानिक मुलांनी मर्दानी खेळ, मल्लखांब आणि कसरती करत उपस्थितांची मने जिंकली, यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्ही सर्व एक मताने ठाम रहा, तुम्हाला जे जे काही विकास कामांच्या स्वरूपात लागेल ते सर्वतोपरी देण्याचे मान्य करतो.




