आसनपोई येथे पार पडलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेत विजय बजरंग पार्ले संघ ठरला अंतिम विजेता
महिला गटात नवतरून क्रीडामंडळ आसनपोई संघाने मारली बाजी
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
कबड्डी हा खेळ मर्दानी खेळ म्हणून ओळखला जातो, गेल्या काही वर्षापासून प्रो कबड्डी अस्तित्वात आली आणि कबड्डी खेळाकडे पाहाण्याचा दृष्टीकोनच बदलला कबड्डी गावोगावी जाऊन पोहचली, तसे पाहयला गेलात तर कोकणात कबड्डी खेळाला फार म्हत्व दिले जाते, इतर खेळांन पेक्षा कबड्डी हा खेळ सर्वात जास्त प्रमाणत खेळला जातो, कोरोना काळात काही काळ मंदावलेला हा खेळ पुन्हा गावोगावी स्पर्धा आयोजित करून खेळवला जात आहे, अनेक खेळाडू यातून उदयास येत आहेत, अशातच कबड्डीचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या आसनपोई गावात काळ दिनांक ७ मे रोजी नवतरूण क्रिडा मंडळ आसनपोई मार्फत भव्य दिव्य आशा चौरंगी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या सामन्याना युवासेना अधिकारी विकासशेट गोगावले, महाड नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत, कॉंग्रेस नेते हनुमंत जगताप यांच्या सारख्या अनेक नेते मंडळीनी आपली उपसस्थिती दाखवत या सामन्यांची शोभा वाढवली, अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार्या या सामन्यात महिला पुरुष असे सामने खेळविण्यात आले, या मध्ये ३२ पुरुष संघानी सहभाग घेतलातर ८ महिला संघानी सहभाग नोंदवला, अतिषय खेळी मेळीच्या पार पडलेल्या सामनामध्ये महिला संघात आसनपोई गावच्या नवतरुण क्रिडा मंडळ आसनपोई या संघाने आपली विजयी घौडदौड कायम राखत प्रथम क्रमांक पटकावला तर शिव कन्या लोहारे संघाला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुष गटात अटीतटीच्या सामन्यान मध्ये पोलादपूर तालुक्यातील पार्ले गावच्या विजय बजरंग पार्ले संघाने प्रथम क्रमांक पटकावूनआपले नाव कोरले असून रोख रक्कम २१ हजार आणि भव्य दिव्य ट्रॉफी असे बक्षीस तर प्रातिस्पर्धी कांजूरमाल कातिवडे संघ हा उपविजेता संघ ठरला असून रोख रक्कम पंधरा हजार आणि ट्रॉफी पटकावली आहे, या नयनरम्य सामान्यांना मोठ्या प्रमाणात कबड्डी प्रेमींनी लावली होती, या भव्य दिव्य अशा अटीतटीच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कातिवडे संघाचा खेळाडू महेश गुडेकर, तर उत्कृष्ट चढाई पट्टू ओंकार रक्ते टाकी याची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट पकड आकाश शिंदे या पार्ले संघाच्या खेळाडुला देऊन गौरविण्यात आले तर पब्लिक हिरो म्हणून पार्ले संघाच्या सौरभ शेडगे देऊन सन्मानित करण्यात आले या सर्व खेळाडूंना सायकल आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले असून सर्वच खेळाडूनी आणि उपस्थित मान्यवरांनी नवतरुण क्रिडा मंडळ आसनपोईने अतिषय नियोजन बद्द सामने खेळवळ्या मुले आयोजकांचे तोंडभरून कौतुक केले.



