आरोग्य व शिक्षण

वहूर येथील कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचा सार्थ आनंद – पालकमंत्री आदिती तटकरे

सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोकरी पूर्व मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे वहूर येथे झालेले जिल्ह्यातील पहिल्या केंद्राचे उद्घाटन हे आपणाला आनंददायी असल्याचे मत रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले असून रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जात असतानाच अन्य क्षेत्रातीलविविध दालने या केंद्रामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी खुली होतील असा विश्वास व्यक्त करून पहिल्या तुकडीतील बहुतांश विद्यार्थिनींचा असलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रायगड जिल्ह्यातील या पहिल्या नोकरी पूर्व मोफत कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या पिंपरी चिंचवड येथील शंकरराव पाटील ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या रायगड जिह्यातील पहिल्या वहूर मधील केंद्राचे उद्घाटन फजंदार हायस्कूलच्या इमारतीमध्ये नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी  या संस्थेचे पदाधिकारी गिरीश देसाई, पद्माताई भोसले, हुसेन हाजीते, संस्थेचे माजी मुख्याध्यापक जनाब पटेल सर महाड चे माजी नगराध्यक्ष मोहम्मद अली पलवकर व काका वैष्णव आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्राच्या उद्घाटनाच्या आपल्या छोटेखानी मनोगतामध्ये पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील या पहिल्या वहिल्या केंद्राचे उद्घाटन वहूर गावांतील फजंदार हायस्कूलच्या विशेष इमारतींमध्ये केला जात असल्याचा आनंद व्यक्त करून रायगड जिल्ह्याची ओळख जरी औद्योगिक जिल्हा म्हणून असली तरी सुद्धा त्याशिवाय इतर असलेल्या विविध क्षेत्रांतील दालने या मोफत कौशल्य प्रशिक्षणकेंद्राच्या माध्यमातून तरूण पिढीला खुली होतील असा विश्वास व्यक्त केला.

संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व सचिव डॉ. गिरीश देसाई यांनी याप्रसंगी संस्थेच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी सुरू करण्यात आलेल्याया प्रशिक्षण केंद्राची माहिती देऊन रायगड जिल्ह्यातील हे पहिले केंद्र असून यापुढे विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी पहिल्या पस्तीस विद्यार्थी विद्यार्थिनींच्या तुकडीसाठी साडेतीन महिने निवासी असणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील असे स्पष्ट केले, कार्यक्रम झाल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राच्या दालनांचे तसेच विविध वर्गांचे उद्घाटन व पाहणी करण्यात आली, या ठिकाणी संस्थेने उपलब्ध केलेल्या अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व संबंधित अत्याधुनिक यंत्रणा पाहून आदिती तटकरे यांनी समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांना वाव देणार्‍या प्रकल्पाची माहिती पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी अधिक मोठय़ा प्रमाणात प्रचार व प्रसिद्धीच्या माध्यमातून रायगड जिल्हाभर पोचवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!