तालुका

निगडे मधली वाडी येथे साठवण तलाव, पाईपलाईन आणि सोलर सेट चे उद्घाटन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते

 

सचिन चांदोरकर – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : नोरयान केमिकल इंडिया या कंपनीच्या सी.एस.आर फंडातून ग्रामपंचायत निगडे मधली वाडी येथे पाणी साठवण तलाव, पाईपलाईन आणि सोलर सेट योजनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण समारंभ सोहळा संपन्न झाला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, नोरयान कंपनी मधील सबंधित अधिकारी, माजी सरपंच कृष्णा मोरे, दिनकर गुरुजी, तंटामुक्ती अध्यक्ष फणसे, सरपंच नूतन गोपाळ मोरे, उपसरपंच शंकर फणसे, ग्रामपंचायत सदस्य, निगडे आणि मधली वाडी येथील ग्रामस्थ महिला भगिनी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी ग्रामस्थांच्या वतीने कंपनीचे आभार मानत मनोगत व्यक्त करताना सांगितले की अशा दुर्गम भागातील छोट्या-मोठ्या वाडीवस्त्यांवर जर आपल्यासारख्या प्रत्येक कंपनी प्रशासनाने CSR फंडामधून जर मदत केली तर या दऱ्या खोऱ्यात दुर्गम भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना शासन करत असलेल्या विकास कामांसोबत आपले देखील मोलाचे सहकार्य राहील,

यावेळी सरपंच आणि ग्रामस्थांनी आमदार भरतशेठ गोगावले यांनी या कामासाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे सदर योजना पूर्णत्वास गेली, तसेच कंपनी व प्रशासनाचे देखील सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!