क्रिडा व मनोरंजन

जय हनुमान स्पोर्ट्स महाड कोटेश्वरी भव्य कबड्डी स्पर्धेत घाणेकरीन् माता दासगाव संघ ठरला अंतिम विजेता

सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

महाड : जय हनुमान स्पोर्ट्स महाड कोटेश्वरी आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत घाणेकरीन माता दासगाव संघ विजयी ठरला तर जय भवानी चांभार खिंड संघाला उप विजेते पदावर समाधान मानावे लागले.

महाड कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेनुसार अनिकेत अनिल कविस्कर यांच्या वाढदिवसा निमित्त सुनील कविस्कर पुरस्कृत माजी नगराध्यक्ष चषक 2022 या स्पर्धे करिता एकूण 32 संघाना निमंत्रण दिले होते.

कबड्डी हा खेळ मर्दानी खेळ म्हणून ओळखला जातो, गेल्या काही वर्षापासून प्रो कबड्डी अस्तित्वात आली आणि कबड्डी खेळाकडेपाहाण्याचा दृष्टीकोनच बदलला. कबड्डी गावोगावी जाऊन पोहचली तसे पाहयला गेलो तर कोकणात कबड्डी खेळाला फार म्हत्व दिले जाते इतर खेळांन पेक्षा कबड्डी हा खेळ सर्वात जास्त प्रमाणत खेळला जातो, कोरोना काळात काही काळ मंदावलेला हा खेळ पुन्हा गावोगावी स्पर्धा आयोजित करून खेळवला जात आहे, अनेक खेळाडूयातून उदयास येत आहेत अशातच जय हनुमान स्पोर्ट्स महाड कोटेश्वरी येथे अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध पद्धतीने या कबड्डी स्पर्धा पार पडल्या.

अतिशय खेळीमेळीच्या पार पडलेल्या सामन्यामध्ये घाणेकरीन माता दासगाव संघ विजयी ठरला तर जय भवानी चांभार खिंड संघाला उप विजेते पदावर समाधान मानावे लागले.

दासगाव संघाला रोख रक्कम २१ हजार आणि भव्य दिव्य चषक असे बक्षीस तर प्रातिस्पर्धी जय भवानी चांभारखीड संघाला रोख रक्कम पंधरा हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले, तृतीय क्रमांक युवा स्पोर्ट्स करंजखोल, चतुर्थ क्रमांक जाकमता दादली यांनारोख रक्कम आणि चषक देण्यात आले.

या नयनरम्य सामान्यांना मोठ्या प्रमाणात कबड्डी प्रेमींनी  हजेरी लावली होती या भव्य दिव्य अशा अटीतटीच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अमर निवाते याला सायकल, तर उत्कृष्ट चढाई ओंकार देवा निवाते याची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट पकड अभिजित गोलंबडे या खेळाडुला देऊन गौरविण्यात आले. तर पब्लिक हिरो म्हणून सुशांत घुरूप याला देऊन सन्मानित करण्यातआले. सर्वच खेळाडूनी आणि उपस्थित मान्यवरांनी जय हनुमान स्पोर्ट्स कोटेश्वरी यांनी अतिशय नियोजन बद्द सामने खेळवळ्या मुळे आयोजकांचे तोंडभरून कौतुक केले.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अनिकेत कविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश सकपाळ, निलेश खेडेकर, सुमित मोरे, विशाल मोरे तसेच इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!