आरोग्य व शिक्षण
स्व. गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात मराठा समाजातील दहा गरजू विद्यार्थ्यांना सवलतीत शिक्षण
अक्षय भोसले यांच्या पाठपुराव्याला यश
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
महाड : श्री भगवानबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बिरवाडी येथे चालविण्यात येणाऱ्या स्व. गोपिनाथ मुंढे कनिष्ट महाविद्यालयात मराठा समाजातील दहा गरजू विद्यार्थी विद्यार्थीनींना शैक्षणिक सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अक्षम भोसले यानी या कनिष्ट महाविद्यालयात मराठा समाजाच्या दहा विद्यार्थ्यांना सवलतीच्या शुल्कात प्रवेश देण्याची मागणी करणारे निवेदन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केंद्रे यांना दिले होते. त्याला केंद्रे यांनी प्रतिसाद दिला आहे.
दहा गरजू मराठा विद्यार्थ्यांना केवळ प्रवेश अर्ज २०० रुपये आणि रजिस्ट्रेशन शुल्क १५०० रुपये भरावे लागणार आहेत.
अक्षय भोसले यांच्या विनंती नंतर राजेंद्र केंद्रे यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.



