कृषीवार्ता

शेतकऱ्याला नवीन बैल घेण्यासाठी शिरगांवचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी केली मदत


सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

महाड: दि 18 जून रोजी काही कामानिमित्त शिरगांवचे सरपंच सोमनाथ ओझर्डे हे कोंडमालुसरे गावात गेले असता त्या गावातील माजी सरपंच विजय पवार यांच्या कडून समजले की, रेवतेळे ग्रुप ग्रामपंचायत मधील शेतकरी नामदेव अंनत जाबरे शेतात नांगरणी करत असताना अचानक बैल मयत झाला आहे व ऐन शेतीच्या हंगामात बैल मयत झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे, सध्या बैल बाजारामध्ये बैलांच्या किंमती खूप प्रमाणात वाढल्या आहेत ते पाहता शेतकरी नामदेव जाबरे यांना नवीन बैल घेणे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नाही, शेतकरी असो वा इतर कोण आर्थिक परिस्थिती मदत करण्यास तत्पर असणारे शिरगांवचे सरपंच सोमनाथ ओझर्डे हे गावामध्ये आले असता कोंडमालुसरे चे माजी सरपंच विजय पवार यांनी रेवतेळे ग्रुप ग्रामपंचायत मधील शेतकरी नामदेव जाबरे यांची संपूर्ण आर्थिक परिस्थिती सांगितली ते ऐकल्यानंतर शेतकरी नामदेव जाबरे यांना भेटले आणि नवीन बैल घेण्यासाठी पैसे स्वरूपात आर्थिक मदत केली, शेतकऱ्याने आर्थिक मदत केल्याबद्दल सोमनाथ ओझर्डे यांचे आभार मानले.

यावेळी रेवतळे गावाचे माजी सरपंच व कुणबी समाजाचे नेते विजय पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!