महाराष्ट्र

निर्यात दिवसानिमित्त उद्योग विभागामार्फत निर्यातीशी निगडीत चर्चासत्र संपन्न

डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक

भारत देशाच्या ७५ स्वातंत्रदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच आजादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाकडील निर्देशानुसार विदेश व्यापार महानिदेशालय यांच्या समन्वयाने उद्योग विभागामार्फत निर्यात दिवस साजरा करण्याकरीता आणि निर्यातीशी निगडीत चर्चासत्र कार्यक्रम आज रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

रायगड जिल्हयाचा राज्यातील निर्यातीमधील हिस्सा वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हयातील निर्यातक्षम व निर्यात करण्याच्या उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहाय्य करण्यासाठी जिल्हा निर्यात प्रचालन परिषद कार्यरत आहे. जिल्हयातील निर्यात वाढीसाठी विविधजिल्हा कार्यालये, औद्योगिक संघटना, निर्यात परिषदा, निर्यात सल्लागार इ. यांच्याशी सातत्याने पाठपुरावा समन्वय व अडचणी दूरकरण्याच्या दृष्टीने जिल्हा निर्यात प्रचालन समिती कार्य करणार आहे. त्यानुषंगाने निर्यात दिवस साजरा करण्यासाठी निर्याती संदर्भातील चर्चासत्र व प्रदर्शन याद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरीसहकारी संस्था च उत्पादक प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालनसमितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, बँका इ. क्षेत्रातील तज्ञ व संस्था यांना आमंत्रित करून चर्चासत्र आयोजितकरण्यात आले.

यावेळी निर्यातदारांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये संदीप पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हाउद्योग केंद्र, रायगड, हरुण विलाल, उप संचालक, विदेश व्यापार महानिदेशालय (DGFT) मुंबई, श्रीमती शम्पा बिस्वास, क्षेत्रियव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, अलिबाग, श्री. सुरेश कांबळे, सहाय्यक आयुक्त, CGST, पनवेल, श्री. प्रफुल्ल वाल्हे केमिक्सील, मुंबई, श्री. जावस चेट्टीयार, इंजिनिअरींग एक्सोर्ट प्रमोशन कौन्सील, मुंबई, श्री. उज्वला बानखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड, श्री. पवन बर्मन, एक्सपोर्ट केडीट गॅरंटी कार्पोरेशन (ECGC ) ठाणे, श्री. विजयकुमार लोखंडे, संचालक, मे.एच. के.एस, इम्पेक्स प्रा. लि. तळोजा, सूत्र संचालक श्रीमती किरण करंदीकर यांनी  उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी श्री. प्रदीप नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी, RDC Bank, अलिबाग तसेच कार्यशाळेसाठी निर्यातदार, निर्यातक्षमउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक प्रक्रिया उत्पादक केंद्रव राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य उपस्थित होते.

रायगड जिल्हा औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्हा आहे. रायगड जिल्हयाचा आर्थिक व सामाजिक विकास औद्योगिकरणामुळे झाला आहे. रायगड जिल्हयात २०८ मध्यम व मोठे तसेच १ हजार ३२६ लघु उद्योग कार्यरत आहेत. रायगड जिल्हयामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी, रसायने व औषधे, आयर्न व स्टील, सिमेंट इ. चे उत्पादन करणारे उद्योग हे निर्यातक्षम उद्योग आहेत. तसेच रायगड जिल्हयाला नैसर्गिकसमुद्र किनारा लाभला असल्याने मत्स्यव्यवसाय व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग हे निर्यातक्षम उद्योग आहेत. रायगड जिल्हयात पांढऱ्याकांदयाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, पाढरा कांदा उत्पादन हा कृषी उद्योग देखील निर्यातक्षम उद्योग आहे.

रायगड जिल्हयातील पेण परिसरात गणेशमूर्ती बनविण्याचे ३९७ नोंदणीकृत उद्योग घटक असून हा उद्योग देखील निर्यातक्षम उद्योग आहे. रायगड जिल्हयात वेअर हीसिंग आणि लॉजिस्टीक सर्व्हिसेस उद्योग मोठया प्रमाणात असल्याने निर्यातक्षम उद्योगांना सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापारामधील देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्वाचा मापदंड आहे. राज्यातर्फे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्यासाठी विविध पुढाकार घेण्यात येत आहेत. व्यूहरचना आखण्याकरीता एक अभ्यास अहवाल तयारकरण्यात आला असून, त्यामध्ये वस्त्रे, अभियांत्रिकी वस्तू, कृषी उत्पादन आणि प्रक्रियाकृत खादय पदार्थ, आयटी आयटीईएस अॅटो वअँटोचे सुट्टे भाग, औषधे व रसायने ही प्रमुख क्षेत्रे निर्यात वाढीसाठी अघोरेखित करण्यात आली आहेत. केंद्र शासनाने विविध औद्योगिकक्षेत्रासाठी वाणिज्य मंत्रालय, यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली विविध निर्यात प्रचालन परिषदा ( Export Promotion Council ) यांची स्थापना केलेली आहे. निर्यात प्रचालन परिषदा संबंधित क्षेत्रातील निर्यात वृध्दीसाठी मार्गदर्शन व समन्वयासाठीची विविध कार्येकेंद्र शासनाच्या निर्देशानुसार कार्यरत आहेत.

राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहाय्य करण्यासाठी तसेच राज्यातील संभाव्य निर्यात क्षमता असलेल्याविविध क्षेत्रामधून निर्यातवृध्दी होण्यासाठी देशामध्ये अस्तित्वात असलेल्या निर्यात परिषदांच्या धर्तीवर राज्यस्तरावर महाराष्ट्र निर्यातप्रचालन परिषद तसेच जिल्हास्तरावर जिल्हा निर्यात प्रचालन समिती ( District Export Promotion Council) महाराष्ट्र शासनाच्यादिनांक १९ ऑक्टोबर २०२० च्या शासन निर्णयाद्वारे गठीत करण्यात आल्या आहेत.

देशाच्या तसेच राज्याच्या एकूण निर्यातीमध्ये जिल्हयाचा वाटा वाढविण्यासाठी जिल्हयातील लघु व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहाय्य तसेच जिल्हयातील संभाव्य निर्यात क्षमता असलेल्या विविध क्षेत्रामधुन निर्यातवृध्दी होण्यासाठी आणिनिर्यातदारांमध्ये जागरुकता आणून त्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी तसेच जिल्हयातील निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने आणिउद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा निर्यात प्रचालन परिषद कार्य करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!