ब्रेकिंग
कोकण विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे
स्वप्नील ढवण – उपसंपादक महाराष्ट्र राज्य
कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील (भा.प्र.से.) हे गुरुवार, दि. 30 जून 2022 रोजी पासून नियत वयोमानानुसार शासकीयसेवेतून सेवानिवृत्त झाले.
तद्नंतर प्रशासकीय कारणास्तव कोकण विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.



