तालुका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत महाडमध्ये दांडिया रास गरबा स्पर्धा संपन्न

स्नेहल जगताप यांच्या संकल्पनेतून व हनुमंत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्नेहल माणिक जगताप यांच्या संकल्पनेतून व हनुमंत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाड मध्ये दांडिया रास गरबा स्पर्धा २०२३ ग्रामीण व शहर भागातील स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मा. वरुण सरदेसाई, मा. विक्रांत जाधव, मा. सुधीर ढाणे हे उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी अनेक स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता, ग्रामीण भागातील प्रथम क्र. करजंखोल, द्वितीय क्रमांक वरंडोली, तृतीय क्रमांक गांधारपाले, चतुर्थ क्रमांक दादली, विशेष पारितोषिक म्हणून गोंडाळे आदिवासी वाडी आणि शहरी भागातील प्रथम क्र. के. के. पी महाड ग्रुप प्रभात कॉलनी, द्वितीय क्र. नुतन मित्र मंडळ महाड व जय जिजाऊ ग्रुप महाड, तृतीय क्रमांक राम वरदायिनी कुंभार आळी महाड, उत्तेजनार्थ नवरात्र मित्र मंडळ माणगाव यांनी पटकविला असून सर्व स्पर्धेकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उस्तवात आणि आनंदी वातावरणात पार पडला.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!