भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण वानखेडे स्टेडियम मुंबई येथे संपन्न
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य
मुंबई तील वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या विख्यात क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले आहे.
वानखेडे स्टेडियमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा हा २२ फुटी पुतळा उभारण्यात आला असून आंतरराष्ट्रीय मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी तो तयार केला आहे.
या सोहळ्यास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांचे सर्व कुटुंबिय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआयचे खजिनदार, आमदार ॲड. आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक, सहसचिव दीपक पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
