रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांमधील आरक्षण व सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
मितेश महाले – सहसंपादक
मा. राज्य निवडणूक आयोग यांच्या कडील दि. 22 जुलै 2022 अन्वये राज्यात 115 नगरपरिषदा व 9 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे. या आदेशानुसार राज्यातील एकूण 115 नगरपरिषदा वनगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलायांच्या करिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे. तसेच याआदेशाद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यामधील महिलांसाठी यापूर्वी निश्चित केलेल्या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. मात्र सर्वसाधारण महिलांचे सोडतीद्वारे काढलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे.
सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरीता नोटीस प्रसिद्ध करणे ( जिल्हाधिकारी व नगरपरिषदेच्या वेबसाईटसह), कार्यवाही कोणी करावयाची आहे –जिल्हाधिकारी, टप्पा सुरु करण्याचा/ संपविण्याचा दि. – दि. 26 जुलै मंगळवार. नगरपरिषदांच्या/नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढणे ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला), कार्यवाही कोणी करावयाची आहे–
मुख्याधिकारी, टप्पा सुरु करण्याचा/संपविण्याचा दि. 28 जुलै गुरुवार. आरक्षणाची अधिसूचना (कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी हरकती तसेच सूचना मागविण्याकरीता वृत्तपत्रात तसेच स्थानिक पातळीवर व जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या/ नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे– जिल्हाधिकारी, टप्पा सुरु करण्याचा/संपविण्याचा दिनांक – दि. 29/07/2022(शुक्रवार).
आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी, कार्यवाही कोणी करावयाची आहे– जिल्हाधिकारी, टप्पासुरु करण्याचा/संपविण्याचा दिनांक – दि. 29/07/2022(शुक्रवार) ते 01/08/2022 (सोमवार) पर्यंत.
आरक्षण व सोडतीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे पाठविणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे– जिल्हाधिकारी, टप्पा सुरु करण्याचा/संपविण्याचा दिनांक 02/08/2022 (मंगळवार).
नगरपरिषदेच्या/ नगरपंचायतीच्या सदस्य पर्दाच्या आरक्षणास मान्यता देणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे– संबंधित विभागीय आयुक्त, टप्पा सुरु करण्याचा/संपविण्याचा दिनांक – दि.04/08/2022 (गुरुवार)पर्यंत.
सदस्य पदांच्या आरक्षणाची (अधिसूचना कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेचजिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या/ नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे– जिल्हाधिकारी, टप्पा सुरु करण्याचा/संपविण्याचा दिनांक 05/08/2022 (शुक्रवार).
त्यानुषंगाने रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सुधारीत आरक्षण सोडती करीता तसेच आरक्षण व सोडतीवरील प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्विकारणेकामी खालील प्रमाणे ठिकाण व वेळ निश्चीत करणेत येत आहे.
नगरपरिषदेचे नाव: खोपोली, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचनास्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि.28 जुलै2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– खोपोली नगरपरिषद कार्यालय, ता.खालापूर, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक ववेळ– शुक्रवार, दि.29 जुलै 2022 ते सोमवार, दि.01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: अलिबाग, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि. 28 जुलै 2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– अलिबाग नगरपरिषद कार्यालय, ता.अलिबाग, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक ववेळ– शुक्रवार, दि.29 जुलै 2022 ते सोमवार, दि.01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: महाड, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचनास्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, महाड नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि. 28 जुलै2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– महाड नगरपरिषद कार्यालय, ता. महाड, जि. रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ– शुक्रवार, दि. 29 जुलै 2022 ते सोमवार, दि. 01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: माथेरान, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि. 28 जुलै 2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– माथेरान नगरपरिषद कार्यालय, ता.कर्जत, जि. रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ– शुक्रवार, दि.29 जुलै 2022 ते सोमवार, दि. 01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: मुरूड जंजिरा, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचनास्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, मुरूड जंजिरा नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि.28 जुलै2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– मुरूड जंजिरा नगरपरिषद कार्यालय, ता.मुरूड, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक ववेळ– शुक्रवार, दि.29 जुलै 2022 ते सोमवार, दि.01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: पेण, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचनास्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि.28 जुलै 2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– पेणनगरपरिषद कार्यालय, ता. पेण, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ– शुक्रवार, दि.29 जुलै 2022 ते सोमवार, दि.01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: रोहा, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचनास्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, रोहा नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि.28 जुलै 2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– रोहानगरपरिषद कार्यालय, ता.रोहा, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ– शुक्रवार, दि.29 जुलै 2022 ते सोमवार, दि.01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: श्रीवर्धन, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचनास्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि.28 जुलै2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय, ता.श्रीवर्धन, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक ववेळ– शुक्रवार, दि.29 जुलै 2022 ते सोमवार, दि.01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
नगरपरिषदेचे नाव: उरण, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचनास्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ– गुरुवार, दि. 28 जुलै2022, सायं. 4.00 वाजेपासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण– उरण नगरपरिषद कार्यालय, ता.उरण, जि.रायगड, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक व वेळ– शुक्रवार, दि.29 जुलै 2022 ते सोमवार, दि.01 ऑगस्ट2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत.
तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.



