तालुका
कोकण कला व शिक्षण संस्था आणि महाराजा युवा प्रतिष्ठान, तळेगांव तळा ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू मुलाना शालेय वस्तू वाटप
सूरज पुरारकर– तालुका प्रतनिधी तळा
शनिवार दि 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 09:30 वाजता कोकण कला व शिक्षण संस्था आणि महाराजा युवा प्रतिष्ठान तळेगांव आयोजित रा.जि.प. शाळा चरई गौळवाडी आदिवासी वाडी येथे शालेय मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले, या वेळी उपस्थित गावकरी, मुख्याध्यापिका कल्याणी ताई वाजे, ढोले सर, महाराज युवा प्रतिष्ठान तळेगांव सदस्य वैभव दिलीप कदम, विशाल शांताराम कदम, सौरभ अशोक जागुष्टे, प्रफुल वसंत पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय हिलम, गावचे अध्यक्ष गणपत कोळी, मोतीराम पवार, रामदास हिलम आणि चंद्रकांत हिलम उपस्थित होते, या सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम आनंदात पार पडला, पालक विद्यार्थी व शिक्षक यांचे कडून आभार व्यक्त करण्यात आले.




