तालुका

महाड मध्ये दहीहंडी प्रचंड उत्साहात साजरी

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड : दोन वर्षाच्या कोरोना नंतर यंदा महाड मध्ये ढाकु माकुम, बोल बजरंग बली की जयच्या घोषात प्रचंड उत्साहात आणि तेवढ्याच जल्लोषात सर्वत्र दहींडी उत्सव शांततेत नियोजन बद्द कोणतीही इजा गालबोट न लागता वरून राजाच्या साक्षीने साजरा करण्यात आला.

कोकणातील मुख्य सण उत्सवा मधला दहीहंडी हा एक पारंपरिक, सामाजिक उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षाची परंपराआता. आता हा उत्सव स्पर्धात्मक आणि तेवढाच व्यावसायिक झाला आहे यामुळे त्याला आता अधिक महत्व प्राप्त होवू लागलय.

महाडमध्ये आमदार भरतशेठ गोगावले मित्र मंडळ ५१ हजार तर मनसेची ४४ हजार आणि शिवाजी चौक मित्र मंडळाची २१ हजाररोख रक्कमेच्या दहींदडी फोडण्या करिता उंचच उंच थर लावण्या करिता दिवसभर रायगड रत्नागिरी मधील गोविंदा पथकांच्यात  स्पर्धादिसून आली होती. गोविंदा पथकांचा थरार पहाण्यासाठी शहरांत जणू जत्रेच स्वरूप आल होत.

 शहरांतील रायगड बँकेजवळ आमदार भरतशेठ गोगावले मित्र मंडळाची सात थरांची दहीहंडी बांधण्यात आली होती यामध्ये चार थरांना ५ हजार रोख रक्कम पाचथर ७ हजार सहाथर १० हजार तर 7 थर लावणाऱ्या दापोली आणि रोहा येथील गोविंदा पथकाला पंचवीस हजार रोख रक्कम देण्यात आली. संध्याकाळी उशिरा पर्यंत भरत शेठ गोगावले मित्र मंडळ आयोजित दहीहंड उत्सवाला असंख्य पथक हजेरी लावत होती. मंडळा तर्फे अतिशय नियोजन बद्ध आयोजन केले होत. या वेळी महापुराच्या वेळी ज्यातरुणांनी बचाव कार्य केले त्या सर्वांचा तसेच सिस्केप संस्थेचा या ठिकाणी  गौरव करण्यात आला.

लायन्स क्लब इमारत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड उपजिल्हा प्रमुख चेतन दादा उतेकर यांच्या वतीनेही रोख रक्कमेची बक्षीसांची रक्कमेची बक्षिसे लुटण्यासाठी अनेक गोविंदा पथकानी आपला सहभाग नोंदविला होता.

तर दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वहात होता. यावर्षी प्रथमच महिला गोविंदा पथकांनी नोंदविलेला सहभाग आणि त्यांनी लावलेले थर सर्वांची वाहवा मिळवून गेले. जणू काही हम भी कुछ कम नही असाच खेळ त्यांनी सादर केला. 

मागील वर्षी महाड शहरांत आलेल्या जलप्रलयात अनेक धाडसी तरुणांनी आपल्या जिवाची बाजी लावत अनेकांचे प्राण वाचवलेहोते आयोजकांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले तर चेतन दादा उतेकर यांच्या मनसे दहिहंडीत अनेक तरुण शरीर सौष्टव यानी आपल्या धारदार बॉडीच दर्शन घडविले.

दहिहंडी उत्सव उत्साहात आणि तेवढ्याच शांततेत आणि  आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिक ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात ठवण्यात आला होता. तालुक्यातही प्रत्येक गावांत वाड्यांवर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाअधून मधून जोरदार कोसळणार्या पावसाच्या सरी गोविंदा पथकाचा उत्साह वाढवत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!