तालुका

सन्मान रिअल हिरो / फ्रीडम ग्रुप चा स्तुत्य उपक्रम

 

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड : वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून फ्रीडम ग्रुप, महाड तर्फे अनेक समाजिक उपक्रम राबविण्यात आले. फ्रीडम ग्रुप महाड तर्फे वर्षभर अनेक समाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ग्रुप तर्फे सफाई कामगार आणि भारतीय जावनांचा सन्मान करण्यात आला. तसेच वृक्षारोपण कार्यक्रम देखील राबविण्यात आला.

दिवसभर घाणीत काम करून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या  अर्चना सर्व्हिसेस च्या ५८ कामगारांचा फ्रीडम ग्रुप तर्फे ज्या ठिकाणी सकाळी ते काम करत होते त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना शाल, नारळ आणि भेट वस्तू देऊन महाड कर नागरिकांच्या साक्षीने सन्मान करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर पाटील, दिपक उतेकर यांचा देखील ग्रुप तर्फे यथोचीत सन्मान करण्यात आला.

हे सफाई कामगार 365 दिवस कामावर हजर असतात. कोणत्याही प्रकारची सुट्टी ते घेत नाहीत. वर्षभर घाणी मध्ये काम करून महाडकरांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. आज जो सन्मान केला तो ग्रुप च्या वतीने नसून संपूर्ण महाड करांच्या वतीने केला आहे – विशाल मांगडे, फ्रीडम ग्रुप अध्यक्ष, त्या नंतर फ्रीडम ग्रुप तर्फे संपूर्ण महाड मध्ये वृक्ष रोपण करण्यात आले. कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू ऑक्सिजन अभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसले आहेत. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी महाड मध्ये एकनिसर्गरम्य वातावरण तयार व्हावे म्हणून ग्रुप तर्फे वृक्षारोपण करण्यात येवून प्रत्येक झाडाभोवती कापडी जाळी लावण्यात आल्या. संपूर्णझाडांना पाणी टाकण्याची जबाबदारी नागरिकावर सोबविण्यात आली. यावेळी एकूण 75 झाडें लावण्यात आली. त्यामध्ये आंबा, पेरू, चिकू, काजू, वड, लिंबू अशा प्रकारच्या झाडांचा समावेश होता.

          तसेच भारतीय सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणाऱ्या नवेनगर येथील श्री गणेश गृहनिर्माण सोसायटीमधील जावनांचा फ्रीडम ग्रुप तर्फे यावेळी शाल नारळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!