महाराष्ट्र

राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

अभिजीत ढाणिपकर – शहर प्रतिनिधी महाड

राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेच्या प्रमाणपत्रांचे वितरण आज करण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असून शिवनेरी सह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल असे या समयी मुख्यमंत्री यांनी सांगितले.

विधान भवनात आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!