शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्वाच्या अभियानाचा पुढचा टप्पा पिंपरी चिंचवड येथे पडला पार
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य
या टप्प्यात १ एप्रिलपासून या अभियानाची सुरुवात झाल्यापासून पुणे जिल्ह्यात २ लाख ८६ हजार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात आला आहेत.
राज्यातील युती सरकार हे लोकाभिमुख सरकार असून या सरकारच्या माध्यमातून शासकीय योजना आपल्या दारी आणण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. आतापर्यंत राज्यात ३५ लाख नागरिकांपर्यंत शासन पोहोचले आहे. १०४ शिबिराच्या माध्यमातून २८६ कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे. या अभियानामुळे कोणीही पात्र लाभार्थी विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही यासमयी बोलताना त्यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील २०१८ ते २०२३ पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील अनधिकृत बांधकामासाठीचा ४६० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपुत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
तसेच पालखी मार्ग आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. चांदणी चौकातील कामही पूर्ण होत आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आणि वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज स्मारक काम लवकरच सुरू करण्यात येईल. यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी ५ कोटी रुपये देण्यात येतील. पुण्यातील नद्यांमधील पाणी निर्मळ राहावे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जलशुद्धीकरणासाठी निधी देण्यात आला असल्याचे हे सर्व मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
राज्य शासनाने गेल्या ११ महिन्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास व महिलांसाठी प्रवास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही ६ हजार रुपये भर घालणार असल्याने १२ हजार इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. राज्यातील १८ हजार कोटी रुपयांच्या २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्यामुळे ६ ते ७ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे असे ही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अश्विनी जगताप, माजी आमदार बाळा भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे तसेच सर्व लोकप्रतिनिधी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पालिका क्षेत्रातील सर्व लाभार्थी उपस्थित होते.



