महाराष्ट्र

सोमनाथ ओझर्डे यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड : शिरगांव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सेवाभावी वृत्तीचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ ओझर्डे यांना शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते निक्षय मित्र सन्मानाने गौरविण्यात आले. क्षय रुग्णांसाठी काम करणाऱ्या व्यक्तिंना हा सन्मान देण्यातयेत असतो.

शनिवारी राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात ओझर्डे यांना राज्यपालांनी हा सन्मान प्रदान केला. यावेळेस राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. रामास्वामीआदि मान्यवर उपस्थित होते.

शिरगांव ग्रामपंचायतीचे सरपंच असलेले सोमनाथ ओझर्डे यांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यात आपल्या समाज कार्याच्या माध्यमातून स्वतःची छाप निर्माण केली आहे. कोरोना काळात गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, महापुरानंतर दैनंदिन गरजेच्या साहित्याचे वाटप, गरजू रुग्णांना उपचारांसाठी, शस्त्रक्रियेसाठी मदत, गणेशोत्सवाच्या काळात सुमारे चार हजार चाकरमान्या गणेशभक्तांना मोफत बस सेवा अशा विविध प्रकारच्या सेवा श्री. ओझर्डे यांनी दिल्या आहेत.

सरपंच म्हणून काम करित असताना शिरगांव गावाचा कायापालट करण्यात ओझर्डे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सरपंच म्हणून केलेल्या कामाची दखल घेत दैनिक नवराष्ट्रनेही त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.

त्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘ निक्षय सन्मान ‘ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!