तालुका

बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

राजेंद्र गवसकर – तालुका प्रतिनिधी माणगाव

माणगाव : माणगाव शहरातील संपूर्ण बंजारा समाजातील कार्यकर्ते आणि सदस्य यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला आहे. माणगाव शहरात शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाल्यापासून शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका लावण्यात आला आहे, सदर विकासकामांना भुरळून आणि समाजाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सदर समाजातील सर्व मंडळींनी एकमुखी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी उपस्थित समाजाच्या प्रतिष्ठित मंडळींना अभिवचन देत तुमची उर्वरित जी कामे राहिले असतील ती सर्व लवकरच पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू असा विश्वास देत आपणा सर्वांना शिवसेनेत सन्मानाचीच वागणूक दिली जाईल असा विश्वास दर्शवून सर्व मंडळींना भगवा पताका घालून शिवसेना पक्षात स्वागत केले.

या पक्षप्रवेश यावेळी उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, युवा सेनेचे जिल्हाधिकारी विपुल उभारे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू शेठ साबळे, माणगाव संपर्कप्रमुख जयेश सावंत, माणगाव तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, माणगाव शहरातील नगरसेवक, तालुक्यातील आणि शहरातील शिवसेना युवा सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!